पाचोरा ( प्रतिनिधी ) – शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी पाचोरा भाजपा महिला आघाडीने प्रशासनाकडे केली आहे .
शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी सोशल मीडियातून २६ मेरोजी व्हिडिओद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अर्वाच्च शब्दात वक्तव्य केले होते.या वक्तव्यामुळे पंतप्रधानांच्या प्रतिमेची तसेच देशाची बदनामी होत असल्याने आमच्या भावना दुखावल्या गेल्याचे यावेळी भाजपा महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी सांगितले, त्यामुळे शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी पंतप्रधानांविषयी असे बदनामीकारक विधान करणे हा गंभीर व दंडनीय गुन्हा आहे दीपाली सय्यद यांनी केलेले वक्तव्य गंभीर असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकारी व पोलीस निरीक्षक यांना पाचोरा भाजपा महिला आघाडीच्या वतीने देण्यात आले. याप्रसंगी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष साधना देशमुख , शहराध्यक्ष ज्योती चौधरी, उषा पाटील, सुरेखा कोळी, कल्पना तडवी, प्रिया कोळी, सखुबाई पाटील आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.