चाळीसगाव ;- पावसाया तोंडावर येल शे….कपाशी घरामा पडेल शे…बिवाराले पैसा कथाईन लौ….. हा संवाद चाळीसगाव तालुक्यात गावा गावांत नव्हे घरा घरात ऐकायला मिळतोय.
शेजारच्या तालुक्यांना कापूस खरेदी केंद्र सुरू झाले, पण आपल्या तालुक्यात अजून कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने, शेतकऱ्याची चिंता वाढली आहे
यंदा पाऊस लांबल्याने मे महिना येऊन ठेपला आहे. कापूस उशिरा घरात आला. त्यात फेब्रुवारी मार्च पासून करोनाच संकट उभे राहिले..
दिवाळी नंतर मोजला जाणारा कापूस यंदा मे आला तरी घरात पडून आहे. बहुतांश शेतकरी पुढील खरिपाच्या तयारीला लागले आहेत. शेत तयार करण्यासाठी पैशाची चणचण सुरू झाली.
यंदा व्यापारी खरेदी बंद आहे. जी सुरू आहे तिथे हमीभाव पेक्षा एक हजार ने कमी दराने व्यापारी कंपास खरेदी करताय. आधीच निसर्गाने लुटलं, आता व्यापारी लुटताय.
शेतकऱ्यांना सीसीआय ची एक आशा उरली आहे . चाळीसगाव शेजारील अनेक तालुक्यात सीसीआय ची खरेदी केंद्र सुरू झाली आहे. चाळीसगाव मध्ये अजूनही केंद्र सुरू झालेला नाही.
केंद्र सुरू व्हायला अजून अवधी लागला तर , दिवसाला किमान 40 शेतकरी या प्रमाणे टोकण मिळायला महिने लागतील. ज्याची खरेदी झाली त्यांना पेमेंट ला किमान 20/25 दिवसाचा वेळ लागेल
म्हणजे ऐन पावसाळ्याच्या दिवसात पेरणीला पैसे नाहीत अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
ज्या शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळाली , पण बँकेत पैसे आले नाहीत, अशांना कर्ज कसं उपलब्ध होणार, याबाबत संभ्रम अवस्था आहे. याबाबत प्रशासन भूमिका स्पष्ट करत नाही
या सर्व परिस्थिती मध्ये सावकारी वाढून शेतकरी सावकाराच्या दृष्टचक्रात आडकण्याची परिस्थिती आहे.