जळगाव ( प्रतिनिधी ) – सीटी हॉस्पिटलजवळून तरूणाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लांबविली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
योगेश संजय सरदार (वय-२६) हे . वाघनगर भागात कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करतात. २८ मेरोजी दुपारी ते कामासाठी गोविंदा रिक्षा स्टॉप येथील सीटी हॉस्पिटलजवळ मोटारसायकलने आले होते. त्यांनी त्यांची बजाज पल्सर हॉस्पिटलजवळ लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची बजाज पल्सर चोरून नेली. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू मोटारसायकल कुठेही आढळून आली नाही. ३० मेरोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना प्रफुल्ल धांडे करीत आहेत.