जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील कंजारवाडा भागात महावितरणच्या वीज ट्रान्स्फार्मरला आज सायंकाळी अचानक आग लागली होती . महापालिकेच्या अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखत तातडीने हालचाली करीत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी मदत केली .
आज संध्याकाळी ६:०० कंजरवाडा येथील वीज ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली या आगीचे लोळ वरपर्यंत जात होते ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल बाहेर निघत असतांना आगीने रौद्ररूप घेतले होते
शिवसेनेचे राहुल नेतलेकर यांनी उपमहापौर कुलभूषण पाटील यांना माहिती दिली अग्निशमनचे श्री बारी यांनी तात्काळ अग्निशमन बंब पाचारण केले जिल्हापेठ पावर हाउस कक्षाचे अभियंता जयेश तिवारी व कर्मचारी महेश कळस्कर, लोंढे, नमो हेही तात्काळ दखल झाले व मदत केली
या वेळी नितीन तमायचे, योगेश बागडे, विजय बागडे, शशिकांत बागडे, विवेक नेतलेकर, निखिल गारुगे, कपिल बागडे, राहुल तमायचे यांनी अग्निशमन दलाच्या पथकाला मदत केली अग्निशमन विभागाचे वाहन चालक निवांत इंगळे, युसुफ पटेल, संतोष पाटील, मोहन भाकरे यांनी प्रसंगावधान राखत ही आग आटोक्यात आणली.