जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील महात्मा गांधी उद्यानाजवळून एका डॉक्टराची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षितिजचंद्र दाजीबा भालेराव (वय-४०) रा. शास्त्री नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते डॉक्टर असून वैद्यकीय सेवा करून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी २८ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शहरातील महात्मा गांधी मार्केट समोरील बगिच्या जवळ ते (एमएच १९ एडब्ल्यू ५५५९) क्रमांकाच्या दुचाकीने आले. दुचाकी पार्क करून खासगी कामासाठी निघून गेले. दरम्यान, त्यांनी पार्किंगला लावलेली ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. भालेराव यांनी दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. रविवारी २९ मे रोजी त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहे.