जळगांव ( प्रतिनिधी ) – सैन्य दलाच्या तिन्ही दलांतील आजी-माजी सैनिक व त्यांच्या परिवारासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात कंट्रोल रूममध्ये तक्रार निवारण केंद्राचे आज पोलीस उप अधीक्षक ( गृह ) संदीप गावित, स्टेशन हेड क्वाटर्स भुसावळ प्रतिनिधी कर्नल अ.क. नायडू यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
स्टेशन हेड क्वाटर्स भुसावळ व जिल्हा सैनिक वेल्फेअर यांच्या प्रयत्नांनी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा सुरु करण्यात आली. तक्रार निवारणासाठी हेल्प लाईन नंबर देखील जारी करण्यात आला. जिल्ह्यातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांना या तक्रार निवारण मदत केंद्राचा लाभ होणार आहे. सैनिकांनी तक्रार निवारणासाठी या 7620205692 क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
पोलीस बिनतारी संदेश विभागाचे पोलिस उप निरीक्षक फारुख तडवी, संजय मराठे, सहाय्यक फौजदार दिपक पुजारी, सागर पाटील, अमित माळी, संघपाल तायडे तसेच सैनिक कल्याण बोर्डचे जनार्दन महाजन यावेळी उपस्थित होते.