मुंबई ( प्रतिनिधी ) – केंद्र शासनाने काल पेट्रोल आणि डिझेलचे अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य शासनाने आजपासून पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात ( व्हॅट ) अनुक्रमे 2 रुपये 8 पैसे आणि 1 रुपया 44 पैसे प्रती लिटर कपात केली आहे.
यामुळे वार्षिक सुमारे 2500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीवर भार पडणार आहे. मूल्यवर्धित कर कमी केल्याने पेट्रोलकरिता 80 कोटी रुपये महिन्याला आणि 125 कोटी रुपये डिझेलकरिता महसुली उत्पंन कमी होणार आहे. 16 जून 2020 ते 4 नोव्हेंबर 2021 या कालावधीत केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 7 रुपये 69 पैसे आणि 15 रुपये 14 पैसे प्रती लिटर कर आकारात होते. मार्च आणि मे 2020 मध्ये केंद्राने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी दरात अनुक्रमे 13 आणि 16 रुपये अशी वाढ केली होती. आता हे दर कमी करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आतापासूनचे पेट्रोलचे नवे दर मुंबई 109.45 पुणे 108.87 नाशिक 109.75 नागपूर 109.35 औरंगाबाद 110.95 परभणी 111.9 रत्नागिरी 110.77 असे असतील .