जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील पूजा ऑफ्टिकल या दुकानासमोर उभी दुचाकी लांबविल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील चंदू आण्णानगरात परशुराम यशवंत पाटील ( वय ४२) हे वास्तव्यास आहे. ते पत्रकार आहेत. गोलाणी मार्केट येथे त्यांचे कार्यालय आहे. परशुराम पाटील हे १६ मे रोजी कार्यालयात आले. यादरम्यान सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांची एम.एच.19 बी.एच.2881 या क्रमांकांची दुचाकी नेहमीप्रमाणे गोलाणी मार्केट येथील पूजा ऑफ्टिकल या दुकानासमोर उभी केली. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास काम आटोपून घरी जाण्यासाठी निघाले असता, त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. चार ते पाच दिवस सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी न मिळाल्याने अखेर परशुराम पाटील यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन शनिवार, २१ मे रोजी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे हे करीत आहेत.