जळगाव ( प्रतिनिधी ) – मुलीचे नाव घेतल्याने तरूणावर चॉपरने वार करून जखमी केल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
शंकर सुरेश सोनवणे (वय-२६) हा . रामेश्वर कॉलनीत कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शंकर सोनवणे याने एका मुलीचे नाव घेतल्याच्या कारणावरून १७ मे रोजी रात्री योगेश भागवत कोळी, निलेश राजपूत (पुर्ण नाव गाव माहित नाही) यांच्यासह इतर दोन जणांनी शंकर सोनवणे हा मोटारसायकलने रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा दुकानासमोरून जात असतांना अडविले. मुलीचे नाव का घेतले असे बोलून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. योगेश कोळी व निलेश राजपूत यांनी चॉपरने शंकरवर वार करून ठार मारण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
१८ मे रोजी दुपारी संशयित आरोपी योगेश कोळी, निलेश राजपूत यांच्यासह इतर दोन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत .