जळगाव ( प्रतिनिधी ) – शेतात बांधलेले ४७ हजार रुपये किंमतीचे दोन ठेलारी जातीचे बैल व एक गोऱ्हा चोरट्यांनी चोरुन नेला एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील धानवड येथील रहिवाशी विलास संतोष पाटील यांची धानवड तांडा शिवारात शेती आहे. या शेातत त्यांनी नेहमीप्रमाणे त्याचे ठेलारी जातीचे दोन बैल व गोऱ्हा दावणीस बांधला होता. १६ मे रोजी दुपारी ते रात्री १० वाजेदरम्यान शेतात बांधलेले दोन बैल व गोऱ्हा दिसून आले नाही. सर्वत्र शोध घेवून बैल व गोऱ्हा मिळून आला नाही. चोरीची खात्री झाल्यानंतर तीन दिवसानंतर शेतकरी विलास पाटील यांनी १८ मे रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत कळसकर हे करीत आहेत.