जळगाव ( प्रतिनिधी ) – विद्यार्थ्यांच्या शालेय कागदपत्रांवर चुकीचे असलेले आईचे नाव दुरुस्त करण्यासाठी त्याच्या पालकांकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापकाला आज लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले .
तक्रारदार हे तरवाडे ( ता.चाळीसगाव ) येथील रहिवाशी आहेत . आरोपी राजेंद्र भास्करराव पाटील ( वय-55 ) कविवर्य ना.धो.महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वडगाव ( ता.सोयगाव ) या शाळेचे मुख्याध्यापक आहेत ते .भगवती हौसिंग सोसायटी, मालेगाव नाक्याजवळ, चाळीसगाव येथे राहतात
तक्रारदार यांचा मुलगा कविवर्य .ना.धो.महानोर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथुन सन-२०२१ मध्ये १२ वी वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झालेला होता निकालाचे प्रमाणपत्र व बोर्ड सर्टीफिकेटवर मुलाच्या आईचे नाव चुकीचे असल्याने दोन्ही प्रमाणपत्रांवरील नाव दुरुस्ती करून आणुन देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे या मुख्याध्यापकाने पंचासमक्ष 1,000/-रुपये लाचेची मागणी केली व रक्कम स्वतः स्वतःच्या घरी स्वीकारली म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल . करण्यात आला आहे .
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील , पो नि . संजोग बच्छाव, पो नि एन.एन.जाधव , स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, पो.ना. मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर , .प्रदिप पोळ. यांच्या पथकाने ही कारवाई केली.