जामनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पळासखेडे मिराचे विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली आमदार .गिरीश महाजन यांचे नेतृत्वाखालील बळीराजा विकास पॅनलचे सर्व १३ उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.
पॅनल प्रमुख शेखर काळे , अण्णा पिठोडे यांच्यासह समर्थक कार्यकर्त्यांनी या विजयासाठी परिश्रम घेतले . सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आमदार गिरीश महाजन यांनी केले आहे .