भडगाव ( प्रतिनिधी ) – भरधाव कार निंबाच्या झाडावर आदळल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली .
एका डॉक्टरांच्या वाहनावर चालक असलेला किसन लखीचंद जाधव (वय ४०, रा. गाळण, ता. पाचोरा ) हा पळासखेडा येथे लग्नाला वाहन घेऊन आला होता. बिदाईला उशीर असल्याने तेवढ्या वेळेत नातेवाइकांना भेटण्यासाठी तो पवन इंदल .राठोड (वय २६, रा. गाळण ह. मु. टिटवाळा ता. कल्याण), जितेंद्र काशिनाथ पवार (रा. ठाकुर्ली, ता. कल्याण, जि. ठाणे) यांच्यासह जात होता. पळासखेडा (ता.भडगाव) येथून एम.एच.१९, सी.एफ. १८०३ या क्रमांकाच्या कारने किसन राठोड, पवन राठोड व जितेंद्र पवार हे तिघेही तरवाडे गावाकडे जात होते. समोरून येणार्या गुरांना वाचवण्याचा प्रयत्नात भरधाव कार रस्त्याच्या बाजूला निंबाच्या झाडावर आदळली. यात किसन जाधव (वय ४०, रा. गाळण, ), पवन राठोड (वय २६, रा. गाळण ह. मु. टिटवाळा ) आणि जितेंद्र पवार (रा. ठाकुर्ली, ) हे तिघे जखमी झाले. ग्रामस्थांनी त्यांना भडगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
कार अपघातातील या ३ मयताच्या आप्तांच्या आक्रोशाने रूग्णालयाच्या परिसरात शोकविव्हळ वातावरण होते. भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो नि अशोक उतेकर हे करत आहेत .