जळगाव ( प्रतिनिधी ) – निवृत्तीनगरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून दागिने आणि रोकड असा ५४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अविनाश वसंतराव साळुंखे (वय-५१) हे शिक्षक निवृत्ती नगर येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ५ मे रोजी सकाळी घराला कुलूप लावून ते बाहेरगावी गेले होते. बंद घर असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील दागिने आणि १० हजाराची रोकड असा ५४ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. अविनाश साळुंखे १३ मे रोजी घरी आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. १४ मे रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील करीत आहेत.