जळगाव ( प्रतिनिधी ) – वाघुर धरणावरील शेतकऱ्यांच्या ७ पाणबुडी मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
प्रशांत राजेंद्र पाटील ( रा. कंडारी ता. भुसावळ ) यांचे वाघूर धरणाजवळ शेत आहे. शेतात पाणी नेण्यासाठी त्यांनी धरणावर पाणबुडी लावलेल्या आहे. १२ मे ते १३ मे दरम्यान या ७ पाण्याच्या पानबुडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या शेतकऱ्यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना सुधीर विसपुते करीत आहेत.