जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील रामदेववाडी येथील एकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र ममतू राठोड (वय-२७) हे रामदेव वाडी, ता. जळगाव येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बांधकाम मिस्तरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. १० मे रोजी सायंकाळी त्यांनी त्यांची मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ बीएक्स ६१७९) लावली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची १० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल चोरून नेली. त्यांनी एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिलींद सोनवणे करीत आहेत.