फैजपूर ( प्रतिनिधी ) – नातेवाईकांकडे लग्नासाठी आलेल्या व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला . फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गजानन दामू भोळे (वय-५५ , रा. पाडळसा ता. यावल ह.मु. अंबरनाथ, मुंबई ) हे पाडळसा येथे लग्न असल्याने अंबरनाथ येथून ८ मेरोजी नातेवाईक विष्णू बाळू भोळे यांच्या घरी आले होते. लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी न्हावी ११ मेरोजी सकाळी विष्णू भोळे यांच्या घरी आले. त्यावेळी आवाज दिला असता आतून कुणाचाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दरवाजा ढकलून पाहिले असता त्यांना दुर्गंधी आली . त्यांना एक कुजलेला मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार लक्षात आला.व गावात खळबळ उडाली फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी पंचनामा केला. विष्णू भोळे यांच्या खबरीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार सुधाकर पाटील तपास करीत आहेत .