चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातून अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एक ट्रॅक्टर पोलिसांनी आज पकडले शहर पोलिसांनी चालकाला अटक करून ट्रॅक्टरासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला
तालुक्यातील डेराबर्डी कडून शहराकडे येणाऱ्या एका विना नंबरच्या ट्रॅक्टरवर पोलिसाचा संशय आला. कर्तव्यावरील शहर पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली. त्यावेळी ट्रॉलीत ७ हजार रुपये किंमतीची सव्वा ब्रास वाळू आढळली . पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा महेंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, ५० हजार रुपये किमतीची तपकिरी रंगाची ट्रॉली व ७ हजार रूपयांची वाळू असा ४ लाख ७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई आज सकाळी पोलिसांनी केली. या कारवाईमुळे वाळू तस्करी करणाऱ्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. निखिल सुनील कुढे (वय-२३ , रा. एम.जे.नगर, चाळीसगाव ) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे. पोकॉ विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात भादवी कलम-३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोना भुषण पाटील करीत आहेत.