जळगाव ( प्रतिनिधी ) – मारहाण , विनयभंगाच्या गुन्ह्यातील सुप्रीम कॉलनीतील ४ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मागणी एमआयडीसी पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे .
कोमल आकाश शिसोदिया ( वय २२ वर्ष, व्यवसाय गृहिणी, रा- सागर अपार्टमेंट जवळ, सुप्रिम कॉलनी, जळगाव ) यांच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेल्या गुरनं. ३३८/२०२२ भादंवि कलम ३५४, ४५२, २९४, ३२३, ५०४, ५०६,३४ या बुन्ह्यात आरोपी नरेंद्र गुलाब मराठे ( वय १९ ) व विजय गुलाब मराठे , ( वय २३ , दोघे रा. गजानन बाबा मंदिराजवळ, सुप्रिम कॉलनी ), आकाश अंकुश जाधव ( वय २२, रा- अभीत कॉलनी, जळगाव ) यांना १० मेरोजी अटक करण्यात आली अन्य आरोपी शंकर रामदास खर्च ( वय ५४ , रा. श्री १२, नितीन साहित्य नगर, सुप्रिम कॉलनी, जळगाव यास ११ मेरोजी अटक करण्यात आली .
सुप्रिम कॉलनी परिसरात फिर्यादी कोमल शिसोदीया यांचे राहते घरी व घराबाहेर १० मे रोजी रात्री आरोपी नरेंद्र गुलाब मराठे फिर्यादीचे घरी त्याचे पातेले मागण्यास आला असता फिर्यादीने त्याच्याकडे बाकी असलेले पैसे मागीतले त्यास राग आल्याने त्याने फिर्यादीस तुझे कशाचे पैसे असे बोलून शिवीगाळ केली त्याच्या सोबतचे विजय मराठे, आकाश जाधव , शंकर यांनीही संगनमताने फिर्यादीस व त्यांच्या कुटूंबीयांना अश्लिल शिवीगाळ , मारहाण करुन फिर्यादीचा विनयभंग केला.
भांडण सोडविण्यास फिर्यादीची आई दिपाबाई जाधव व मामा बल्लु बागडे आले त्यांनादेखील आरोपीनी मारहाण केली फिर्यादीचे घरातील टि.व्ही. फ्रिज व घराबाहेर लावलेली स्कुटी क्रं.एम.एच.१९.डी.यु.५४१ ला दगड मारुन तोडफोड केली तुम्हाला या परिसरात राहु देणार नाही अशी धमकी दिली होती . या सर्व आरोपींवर यापूर्वीही गुन्हे दाखल झालेले आहेत पोलिसांनी त्यांच्या १४ दिवस न्यायालयीन कोठडीची विनंती न्यायालयाला केली आहे.