रावेर ( प्रतिनिधी ) – जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणारा आयशर ट्रक पाल गावानजिक रावेर पोलिसांनी पकडून तेरा गुरांना जीवदान दिले आहे. तीन जणांविरुध्द रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला
९ मेरोजी रात्री कत्तलीच्या उद्दीष्टाने आयशर ट्रकमध्ये १ लाख ६० हजाराची पंधरा जनावरे घेऊन जात असतांना पाल गावानजिक पोलिसांना संशय आल्याने त्यांनी वाहनाची तपासणी केली. त्यावेळी त्यात निर्दयीपणे पशुधन वाहतूक करतांना आढळुन आले दहा गायी व तीन जिवंत वासरे तर दोन वासरू मयत स्थितीत आढळून आले. या ट्रकमधील सर्व जनावरांना गौशाळेत रवाना करण्यात आले आहे.
पोलिसांनी सहा लाखाचा आयशय ट्रक जप्त केला प्रमोद छोटेलाल (रा कोटला यू पी) , गुड्डू खान ( रा नलामीकीनी जिल्हा येटा) , अखिलेश सोदाशिह (रा गोदाऊ यू पी) यांच्या विरुध्द महाराष्ट्र पशु संरक्षण अंतर्गत रावेर पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक कैलास नागरे, पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सह फौजदार महेबुब तडवी, पो.ना.कल्पेश अमोदकर करीत आहेत.