जळगाव ( प्रतिनिधी ) – साईनगरात घरासमोर लावलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरली अज्ञात चोरट्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरीष नवल पाटील ( वय ३० ) हे साईनगर येथे वास्तव्यास आहेत. गिरीश पाटील यांनी सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे त्यांची एम.एच. १९ सी.एल ०२१४ क्रमाकांची मोटारसायकल घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले असता, त्यांना मोटारसायकल आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही मोटारसायकल मिळून न आल्याने गिरीश पाटील यांनी मंगळवारी तालुका पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा करण्यात आला पुढील तपास पो ना अनिल तायडे हे करीत आहेत.