जळगाव ( प्रतिनिधी ) – नशिराबाद येथे बंद घर फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह रोकड असा ७३ हजार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेमंत रामलाल चौबे (वय-६८) हे नशिराबाद ग्रामपंचायत जवळ कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. कामानिमित्ताने ते बाहेरगावी ६ ते ८ मे दरम्यान घर बंद करून गेले होते. घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात ठेवलेले दागिने आणि रोकड असा ७३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ८ मेरोजी हेमंत चौबे रात्री घरी आले, तेव्हा घराचे कुलूप तोडलेले दिसून आले, त्यांनी आत प्रवेश करून पाहिले असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला त्यांनी ९ मे रोजी दुपारी नशिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हे कॉ अतुल महाजन करीत आहेत.