• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटींची वसुली? ; पोलीस खात्यात खळबळ उडवणारे पत्र व्हायरल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2022
in भारत, महाराष्ट्र
0

पुणे ( प्रतिनिधी ) – पिंपरी-चिंचवडमध्ये माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासंबंधी पत्रामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त असताना जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमधून कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा करणारे हे पत्र थेट मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे.

चार सहाय्यक पोलीस आयुक्त, चार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादिंचा समावेश आहे. सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिलं असल्याचं बोललं जातं आहे. डोंगरे यांचं अर्जदार म्हणून नाव आहे. प्रत्यक्षात मात्र हे पत्र आपण लिहिलं नाही, असा दावा डोंगरे यांनी केला आहे. यावर त्यांनी अधिक बोलण्यास टाळलं आहे.

“संबंधित पत्र मी लिहिलेच नाही, असं सांगण्यासाठी माझ्यावर खूप दबाव येण्याची शक्यता आहे. पत्र लिहिल्याचे नाकारावे असेही धमकवण्यात येऊ शकते, मात्र मी माझ्या जबाबावर ठाम आहे”, असं व्हायरल पत्राच्या शेवटी नमूद करण्यात आलं आहे.

अर्जदार सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावाने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी गेल्या दीड वर्षात केलेल्या चुकीच्या कामात मला गोवण्याची शक्यता असून यापासून मला संरक्षण मिळावे. मी तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करून प्रमुख पद माझ्याकडे सोपविण्यात आले. शहरातील जमिनी खरेदी विक्रीची प्रकरणे मला हाताळण्यास सांगितली. त्यातून येणारे कोट्यवधी रुपये मला स्वीकारण्यास सांगितले. आत्तापर्यंत कृष्ण प्रकाश यांच्यासाठी गोळा (वसुली) केलेली रक्कम २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कृष्ण प्रकाश यांनी मला नेमण्याचे कारण कालांतराने समजले. पण पदाने कनिष्ठ असल्याने सगळं करण्यापलीकडे पर्याय नव्हता. ते सांगतील त्याप्रमाणे इच्छा नसताना अशी काम करावी लागायची.

या कालावधीत अनेक बांधकाम व्यवसायिक आणि काही महिलांशी संबधीत नको ती काम करावी लागली. मीडियाला कसे पैसे द्यायचे, हे काम चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना ठरवून करावं लागतं होत. मीडियाला हाताशी धरून सर्वसामान्यामध्ये प्रतिमा उंचावण्याचे काम काही माध्यमप्रतिनिधी आणि नामांकित दैनिकातील पत्रकारांना हाताशी धरून केले जायचे. प्रत्येकाला महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जायची. कृष्ण प्रकाश यांची प्रतिमा उंचावण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांचा वापर करण्यात आला. हे सर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून त्यांच्यापासून माझ्या जीवाला या पत्रानंतर धोका निर्माण होऊ शकतो याची दाट शक्यता आहे. सामाजिक कार्यक्रमात आयुक्त हजर राहून महिलांची कालांतराने माहिती काढली जायची. अशाच काही महिला आयुक्तांच्या संपर्कात आल्याचे लक्षात आले.

लोकप्रतिनिधींना हाताशी धरून केलेले जमिनीचे व्यवहार उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या लोकांनी गोळ्या केलेल्या पैशांच्या संदर्भात मला गोवण्याचा भविष्यात प्रयत्न होऊ शकतो. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक व्यवहाराची फोन रेकॉर्डिंग, आर्थिक देवाणघेवानीची पुराव्यानिशी माहिती आहे. चार सहाय्यक आयुक्तांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बोलावण्यात आले होते ते जमिनीचे प्रकरण पाहून मग आयुक्तालयात पाठवत. या चार ही जणांना शहरातील सर्व व्यवहाराबाबत कल्पना आहे. यातून वरिष्ठ निरीक्षकांना बाजूला ठेवण्यात आले.

मॅटमधून बदली रद्द करून आलेल्या निरीक्षकाडून जबरदस्तीने पूर्वीच्या ठिकाणी नियुक्ती नको असे लिहून घेतले होते. परंतु, चार पोलीस निरीक्षक आणि एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुक्तालयात बसून सगळे व्यवहार सांभाळत होते. आत्तापर्यंत आलेला पैसे मी पूर्णपणे आयुक्त सांगतील त्या ठिकाणी पोहोच करत आलो आहे. यातील एकाही नव्या पैशांचा वापर मी माझ्या वैक्तिक कामासाठी कधी ही केलेला नाही. हे सगळं मी यापूर्वी पोलीस खात्यातील मुंबईतील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिदास दिललेला नाही. त्यामुळं आज अखेर मी माझी कैफियत आपल्या समोर मांडत आहे.

मला आणि माझ्या कुटुंबाला भीती वाटत असून आपल्याकडून सुरक्षितता मिळावी ही अपेक्षा आहे. सदर अर्ज आपणापर्यंत आल्यावर तो मी लिहिलाच नाही अस सांगण्यासाठी माझ्यावर खूप दबाव येण्याची शक्यता आहे. तसेच जबाब बदलावा असे ही धमकवण्यात येऊ शकते, मात्र मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे, असं या व्हायरल पत्रात लिहिलेलं आहे.

सेवा विकास बँक घोटाळा प्रकरणात अटक करण्याचे आदेश असताना संचालकाला अटक न करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये घेण्यात आले. पिंपरीतील एका बेटिंग करणाऱ्याला अटक न करण्यासाठी अडीच कोटी रुपये घेण्यात आले. आयुक्तांच्या वर्षपूर्तीनिमित राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांसाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचा खर्च हिंजवडी आणि मावळ मधील बांधकाम व्यवसायिकाने केला होता.राष्ट्रवादीच्या संबंधित स्पर्श घोटाळ्या प्रकरणी एका पत्रकाराला लाखो रुपये देण्यास कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. या व्हायरल पत्रानंतर पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. या पत्रातील आरोपांसंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी कृष्ण प्रकाश यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.


 

Tags: #pune #maharashtra #bharat
Previous Post

लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठातर्फे

Next Post

उधारीच्या वादात गुप्तांग पिरगाळलेल्या तरुणाचा मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

उधारीच्या वादात गुप्तांग पिरगाळलेल्या तरुणाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025
शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon