जळगाव (प्रतिनिधी) – युवा क्रांती फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी वैशाली सोलंकी यांनी तर राष्ट्रीय महिला संपर्क प्रमुखपदी जयश्री इंगळे तसेच यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
युवा क्रांती फाउंडेशनतर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, युवकांच्या क्षेत्रात कार्य केले जाते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमर बेंद्रे, राष्ट्रीय महासचिव रवींद्र सूर्यवंशी, कार्याध्यक्ष नानासाहेब बडे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष गणेश अदमाने, राष्ट्रीय संपर्क प्रमुख शिवाजी आबाळे, प्रदेशाध्यक्ष रंगनाथ मोरे, महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष संगीता भामरे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
यात जळगाव येथील वैशाली सोलंकी यांची राष्ट्रीय महिला अध्यक्षपदी तर जयश्री इंगळे यांची राष्ट्रीय महिला संपर्क प्रमुखपदी निवड झाली आहे. निवडीबद्दल त्यांनी वरिष्ठांचे आभार मानले आहे,असे महाराष्ट्र प्रदेश संघटक भानुदास पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.