जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील एका खाजगी रुग्णालयाच्या कॉम्पलेक्सच्या तळमजल्यावरील पार्कींगमधून मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सिंधी कॉलनीतील कंवरनगरातील हरिष रामदास वालेचा (वय-३५) हा तरुण त्याच्या एमएच १९ डीएफ ८९९८ क्रमांकाच्या मोटारसायकलने आला होता. त्याने आपली मोटारसायकल खाजगी रुग्णालयाच्या कॉम्पलेक्समधील तळ मजल्यावरील पार्कींगमध्ये लावली अज्ञात चोरट्यांनी त्यांची मोटारसायकल लांबविली. त्यांनी परिसरात मोटारसायकलचा शोध घेतला मात्र मोटारसायकल मिळून न आल्याने त्यांना चोरीची खात्री झाली. वालेचा यांनी बुधवारी शहर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास योगेश बोरसे हे करीत आहेत.