अमळनेर ;- कृषी हंगामातील खरीप पिकांची लागवड आणि वितरण कोरोना असल्याने शेतकऱ्यांपर्यंत विविध पिकांचे, बियाणे खते पोहचवता यावे यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. त्यावर येणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली
बैठकीत आमदार अनिल पाटील यांनी तालुक्यातील संपूर्ण लागणारा बियाणे खते साठा कसा करावा व कृत्रिम टंचाई होऊ नये या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली होती. यावेळी तालुका कृषी अधिकारी भरत वारे, वाय ए बोरसे यांच्यासह कृषी सहाय्यक यांच्यासह एल टी नाना पाटील, माजी तालुकाध्यक्ष शिवाजी दाजभाऊ पाटील, गौरव पाटील आदी व कृषी बी बियाणे व खते विक्रेते उपस्थित होते.
यावेळी चर्चा करतांना या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याला जगवायला हवं तसेच माल घेण्यासाठी शेतकरी शहरापर्यंत येता येऊ नये व माल बाहेरून येतांना अडचणी आणि शहरातील लावलेले बॅरिकेट्स यासाठी पालिका आणि महसूल पोलीस सहकार्य याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी लॉक डाऊन स्थिती असल्याने वाहतूक गोडाऊन यासह हमाल विक्रेत्यांचा स्टाफ याबाबत पासेस यासह घरपोच सुविधा याविषयी संपूर्ण चर्चा केली प्रत्येक कृषी विक्रेत्याला येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत सविस्तर माहिती घेतली. व त्यावर मार्ग काढण्यासाठी आश्वासन दिले. लागणार बियाणे खते साठा उपलब्धी याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र कृत्रिम टंचाई होणार नाही याबाबत आपण दक्षता ठेऊ. कोणत्याही विक्रेत्याने शासन निर्धारित भावापेक्षा कृत्रिन टंचाई करू नये असे आवाहन केले. यावेळी कृषी विक्रेते अध्यक्ष-योगेश पवार,उपाध्यक्ष प्रशांत भदाणे, सचिव मुन्ना पारेख, खजिनदार ललित ब्रह्मेचा ,सल्लागार विजय जैन आदी उपस्थित होते.
यावेळी सन्मान कक्षाचा शुभारंभ देखील आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.