पारोळा (प्रतिनिधी) – शहरात बारा गाड्यां ओढतांना एका गाडीचे चाक बाहेर निघून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून बारागाडींवर उभे असणारे ५ ते ६ तरुण मंडळी व नागरिकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना पोलीस प्रशासन व जमलेला लोकांचा वतीने तात्काळ बाहेर काढून मदत करण्यात आली.

शहरात सालाबादाप्रमाणे अक्षय तृतीयेला बारागाडी उत्सव समितीतर्फे आंबेडकर चौक येथे बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येतो. दोन वर्षापासून कोरोना संसर्गामुळे या उत्सवाला स्थगिती होती. ३ मेरोजी संध्याकाळी अक्षय तृतीया निमित्त बारागाडी उत्सव समितीतर्फे बारागाडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी शहरी भागासह ग्रामीण भागातील ६००० हजार नागरिकांनी गर्दी केली होती.या बारागाडी कार्यक्रमाची सुरुवात पूजाविधी करत सायंकाळी केली
या दरम्यान बारा गाड्यां ओढतांना एका गाडीचे चाक बाहेर निघून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून बारागाडींवर उभे असणारे ५ ते ६ तरुण मंडळी व नागरिकांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. त्यांना पोलीस प्रशासन व जमलेला लोकांचा वतीने तात्काळ बाहेर काढून मदत करण्यात आली.यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.








