जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील कानळदा येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरनेच गल्ल्यातून रोकड व मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले असून संशयित आरोपीला अटक केली आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रूक विजय भिकनराव सोनवणे यांची कानळदा गावात उत्कर्ष नावाने हॉटेल आहे. यात हॉटलातील वेटर सागर ठाकरे याने हॉटेलातील गल्ल्यातून ७० हजारांची रोकड तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर बॉक्स लांबविल्याची घटना गुरुवारी २८ एप्रिल रोजी समोर आली होती. याप्रकरणी हॉटेल मालक विजय सोनवणे यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली होती त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर संशयित वेटर सागर ठाकरे यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहेत.