जळगाव ( प्रतिनिधी ) – शतपावली करणाऱ्या दाम्पत्याला स्कूलबसने दिलेल्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू झाला व पत्नी गंभीर जखमी झाली ही घटना २५ एप्रिल रोजी सकाळी घडली. एमआयडीसी पोलीसात नोंद करण्यात आली आहे. गफ्फार सुलेमान पिंजारी (वय-५४ , रा. सुप्रिम कॉलनी ) असे मयताचे नाव असून पत्नी रईसाबी पिंजारी जखमी झाल्या आहेत.
गफ्फार पिंजारी सुप्रिम कॉलनीत वास्तव्याला आहेत . दररोज ते राष्ट्रीय महामार्गावर पहाटे शतपावलीसाठी जात नेहमीप्रमाणे २५ एप्रिलरोजी सकाळी गफ्फार पिंजारी व त्यांची पत्नी रईसाबी शतपावलीसाठी निघाले. राष्ट्रीय महामार्गावरील नेक्सा शोरूम समोर पिंजारी दाम्पत्य पायी जात असतांना मागून (एमएच १९ डीवाय ९०३४) या क्रमांकाच्या टाटा मॅजीक स्कूलबसने धडक दिली. या धडकेत गफ्फार पिंजारी जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी रईसाबी जखमी झाल्या. त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले स्थानिक नागरीकांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता गफ्फार पिंजारी यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयताच्या पश्चात चार मुले, दोन मुली असा परिवार आहे. जाफर पिंजारी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.