पाचोरा ( प्रतिनिधी ) – लोहारा येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून दागिने व रोकड असा २ लाख ८३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला अज्ञात चोरट्यांविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुकुंदा आनंदा पाटील (वय-५१) हे लोहारी बुद्रुक ( ता. पाचोरा ) येथे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शेती करून उदरनिर्वाह करतात. उन्हाळ्यामुळे कुटुंबीय छतावर गच्चीवर झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून गोदरेज कपाटातून दागिने व रोकड असा २ लाख ८३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सकाळी उघडकीला आला. मुकुंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो उ नि अमोल पवार करीत आहेत.