जामनेर ( प्रतिनिधी ) – मालदाभाडी येथे डेअरी फोडून चोरीच्या प्रयत्नात आलेल्या एकाला पकडले असून इतर दोघे पसार झाले आहे. तीन जणांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील दाभाडी येथे होनेस्त डेअरी आहे. याठिकाणी तांब्याच्या वायरी, लोखंडाचे तुकडे व इतर मशिनरी सामान आहे. २४ एप्रिल रोजी मध्यरात्री आरोपी अरविंद वाघोदे ( रा. मोताळा जि. बुलढाणा ह.मु. सुप्रीम कॉलनी जळगाव) , राकेश गोकुळ राठोड आणि उमेश आठे ( दोन्ही रा. सुप्रीम कॉलनी ) यांनी दुकानाचे शटर तोडून मशीन पेटीचे कुलूप तोडले. सामान चोरून नेण्याचा प्रयत्न करत असताना सेक्युरिटी गार्ड गजानन काळे यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केली इतर दोन जण पसार झाले आरोपी वाघोदे याला ताब्यात घेतले. गजानन काळे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अरविंद वाघोदे, राकेश राठोड, उमेश आठे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास स फौ संजय पाटील करीत आहेत.