अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील सावखेडा बसस्थानकाजवळचे किराणा दुकान फोडून सामान व रोकड असा ४५ हजार ८०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
भवरलाल पुरखाराम चौधरी (वय-३६ ) हे सावखेडा ( ता. अमळनेर ) येथे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे बसस्थानक जवळ त्यांचे किराणा दुकान आहे. १८ एप्रिल रोजी रात्री त्यांनी किराणा दुकान बंद करून घरी निघून गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानच्या मागील पत्रा उचकावून आत प्रवेश करत दुकानातील किराणा सामान व रोकड असा ४५ हजार रुपये ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला १९ एप्रिल रोजी सकाळी हा प्रकार लक्षात आला. भवरलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो हे कॉ सुनिल पाटील करीत आहेत.