औरंगाबाद (वृत्तसंस्था) – औरंगाबादच्या जलाल कॉलनीतील 79 वर्षीय वृद्धाचा कोरोना अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित वृद्धाला 15 दिवसाच्या उपचारानंतर 20 एप्रिलला डिस्चार्ज करण्यात आले होते. यावेळी सबंधित जेष्ठासह 7 रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले. मात्र, या 79 वर्षांच्या वृद्धाचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितलं.
दरम्यान औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण आहे. गेल्या 48 तासांत कोरोना बाधितांची संख्या दुपटीने वाढली आहे. आज बुधवारी सकाळीही कोरोनाचे 11 नवे रुग्ण सापडले आहेत. आता शहरातील रुग्णांची संख्या 120 झाली आहे. दोन दिवसांपूर्वी आकडा पंन्नाशीत होता. मात्र गेल्या 48 तासात ही संख्या दुप्पट झाली आहे.