जळगाव ( प्रतिनिधी ) – के.सी.ई. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात ‘ अंतरंग २०२२ ‘ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांची सुरुवात केसीई सोसायटीचे कोषाध्यक्ष डी.टी.पाटील व आकाशवाणीच्या मुख्य वरिष्ठ उदघोशिका डॉ.उषा शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट, ब्रॉऊचर , इंटरनॅशनल जर्नल, ई मॅगझिन (व्यवस्थापन शाखा आणि तंत्रनिकेतन शाखा )चे अनावरण अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल प्रा.दिगंबर सोनवणे, प्रा.राजेश वाघुळदे, प्रा. सुर्यवंशी, प्रा.बोरसे, प्रा. पवार यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
शब्दांवर प्रभुत्व मिळवा व वेळेचे नियोजन करा यावर प्रेरणात्मक मार्गदर्शन डॉ उषा शर्मा यांनी केले. कोषाध्यक्ष डी टी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर गायन, नृत्य, अभिनय यातुन विद्यार्थ्यांनी कला प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. लीना वाघुळदे होत्या. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, प्रा. संजय दहाड, प्रा. डॉ. प्रज्ञा विखार व सर्व विभाग प्रमुखांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.