अभय दिले जाण्याच्या शंकेने वरिष्ठांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
जळगाव-संशयितांना सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन बदडत आपण दबंग असल्याची स्वमग्न प्रतिमा, राजकीय वादांमध्ये अप्रत्यक्ष सहभागाच्या आहारी जाऊन पूर्वग्रहदूषित कारवायांची भूमिका, अनाकलनिय भूमिका घेऊन प्रसंगी आरोपींनाच अभय देताना हिरोगिरीचा आव आणणे, पत्रकार मनोज नेवेंच्या अटकेचे सबळ समर्थन न करणे, राजकारण्यांच्या नादी लागून विशिष्ट लोकांना त्रास देण्यासाठी कायदा व आपले अधिकार वापरणे, कोरोनाग्रस्त रूग्णाच्या निधनानंतर मृतदेह यावलला आणू नये म्हणून मृताच्या नातेवाईकाला अत्यंत हीन भाषेत दमदाटी करणे, नसलेल्या बढतीसह जळगावच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात बदली झाल्याचा गवगवा करून लॉकडाऊनच्या काळात चेल्यांकडून जाहीर सत्कार स्वीकारणे आदी कित्येक कारणांमुळे वादग्रस्त ठरलेले यावलचे पो. नि. अरूण धनवडे आता सोशल मीडियावरून खिल्ली उडवली जाऊ लागल्यावर वैतागल्याने आदर्शांची भाषा बोलू लागले आहेत. दुसरीकडे त्यांची न झालेली बढतीसह बदली व लॉकडाऊनचे उल्लंघन करून त्यांनी स्वत:च चेल्यांकरवी घडवून आणलेल्या सत्कारांबद्दल पोलिस खात्याचे वरिष्ठ अधिकारी काहीच करायला तयार नसल्याने त्यांच्याकडून धनवडेंना दिल्या जाणार्या अभयाबद्दलही आता प्रश्नचिन्ह लावले जाऊ लागले आहे.
धनवडे यांचे सत्काराचे प्रताप दाखविणाऱ्या व्हिडीओसह जळगावचे माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी धनवडे यांच्या विरोधातील तक्रार ई-मेल वरून जिल्हा पोलीस अधीक्षक , नाशिकचे पोलीस महानिरीक्षक, पोलीस महासंचालक, गृहमंत्री , मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात तक्रार दिली आहे.
सोशल मीडियातून धनवडेंची आदर्शांची भाषा
सोशल मीडियातील चर्चांनी हवा गूल केल्यावर सगळेच वास्तव ध्यानात आलेले पो.नि. धनवडे आता आदर्शांची भाषा बोलू लागले आहेत. धनवडे आता वरिष्ठांकडून तोंडी कान टोचले गेल्यावर भानावर आले असावेत असेही बोलले जाऊ लागले आहे. तथापि त्यांनी मीच कसा सगळा बरोबर हा हेका अजून सोडलेलला नाही त्यामुळे 99 चांगली केलेली कामे एका चुुकीच्या कामामुळे आजच्या जगात निरर्थक ठरवली जातात असा साळसूदपणा सोशल मीडियावरील त्यांच्या प्रतिक्रीयांमध्ये ते दाखवत आहेत.मला पण आता ही नोकरी नकोशी झाली आहे, 3 महिन्यात आयुष्याची कमाई झाली, यावलकरांनी मला खूप प्रेम दिले, …. पत्रकारांना हवा असेल तर मी आता राजीनामा द्यायला तयार आहे, ( पत्रकारांनी त्यांच्या चुकांवर बोट ठेवलेे ते चूक केली का?) परंतु कोणाला नाऊमेद करण्याचा उगाच विडा उचलू नये लोकांचा या लोकशाहीच्या स्तंभावरचा विश्वास दृढ व्हायला पाहीजे. धनवडे यांना चमकोगिरीची गरज नाही काही चुकल्यास आतादेखील घरी बसण्याची हिंमत आहे आणि राबून पोट भरू शकतो. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर माझा पूर्ण विश्वास आहे. धनवडे घरी जाणार … असे असेल तर लवकर घालवा दादा , किमान कोरोनापासून तरी सुटका होईल ..! मी माझ्या स्वार्थासाठी काही केले असे दिसून आले तर मला जरूर शासन व्हावे …!! शिस्त लावण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतात. वयाच्या 46 व्या वर्षी कसली आली दबंगगिरी , मी एक सेवक आहे.जनतेच्या टॅॅक्सवर माझे कुटूंब चालते. असावी टीका , पण कुणाचे आयुष्य अडचणीत आणणारे नकोत, अशी भाषा आता सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना धनवडे साळसूदपणे वापरत आहेत. पत्रकार मनोज नेवे यांना अटक करताना ही कुणाचे आयुष्य अडचणीत यायला नको अशी जाणीव धनवडेंना का झाली नाही? असा संताप पुन्हा पत्रकारांमधून व्यक्त होतो आहे.