पारोळा ( प्रतिनिधी ) – तहानलेल्या पक्ष्यांच्या दाणा – पाण्याची व्यवस्था करणारांना ५१ हजारांची बक्षिसे भाग्यवान विजेत्यांची सोडत काढून देणारा उपक्रम पारोळ्याचे नगरसेवक बापू महाजन राबवत आहेत .
अफाट वृक्षतोडीमुळे आता पक्ष्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे.कडक उन्हामुळे प्यायला पाणी न मिळाल्याने अनेक पशु – पक्ष्यांना जीव गमवावा लागत आहे. पारोळा शहराचे नगरसेवक बापू महाजन यांनी भूमिका गारमेंट्सतर्फे तहानलेल्या पशु पक्ष्यांसाठी “एक स्पर्धा तहानलेल्या पक्ष्यांसाठी “हा उपक्रम राबविला आहे.
या स्पर्धेत फक्त १ वाटी कडधान्य आणि एका ताटात पाणी घराच्या गॅलरीत अथवा छतावर ठेवायचे असून त्याचा फोटो अयोजकाला पाठवायचा आहे. .५ जून रोजी भाग्यवान विजेत्यांना विविध स्वरूपात ५१००० हजार रुपयांची बक्षिसे वाटप करण्यात येणार आहेत.
या स्पर्धेचा उद्देश हा मुक्या पशु पक्ष्यांच्या जीव वाचावा आणि लहान मुलांमध्ये दातृत्वाची भावना निर्माण व्हावी हा असून जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन बापू महाजन यांनी केले आहे.