जळगांव ( प्रतिनिधी ) – शहरातील मेहरूण भागातील अशोक किराणा चौकात पोलिसांनी सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड टाकून ११ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे . त्यांच्या ताब्यातून सट्ट्याच्या – जुगाराच्या साहित्यासह रोख 6,300/- रुपये जप्त करण्यात आले .
पो.कॉ. छगन तायडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , काल त्यांच्यासह स.फौ. आनंदसिंग पाटील, पो.ना. गणेश शिरसाळे, सचिन पाटील, चेतन सोनवणे, पो.कॉ. चंद्रकांत पाटील यांना एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी सूचना दिली होती की शहरातील मेहरुण, अशोक किराणा चौकसमोर एका पत्राच्या शेडमध्ये सिराज सैय्यद रफीयोद्यीन लोकांना मजुरीने लावुन वरली मटका नावाचा सट्ट्यांचे आकडे स्विकारुन सट्टा जुगाराचा खेळ-खेळवित आहे पंचांना सोबत घेऊन पोलीस तेथे पोहचल्यावर तिन इसम खाली बसुन आकडे व पैसे स्विकारतांना व त्यांचे भोवती घोळका करुन काही लोक आकडे व पैसे देतांना दिसले. छापा टाकून त्यांना जागीच पकडले.
या धाडीत सिराज सैय्यद ( वय 49 वर्ष, रा. शेरा चौक, मास्टर कॉलनी) , शेख जावेद ( 28 वर्ष, रा. अशोक किराणा चौक ) , अरुण भदाणे ( वय 50 वर्ष, रा. तलाठी कार्यालयाजवळ, मेहरुण) या अड्डा चालवणाऱ्या आरोपींसह विजय सोनवणे ( वय 60 वर्ष,रा. राम नग ) ,पंकज महाजन ( वय 23 वर्ष, रा. गोपाल फॅन्सी, तृप्ती कॉर्नर जवळ, अयोध्यानगर ), सुपडु सपकाळे ( वय 42 वर्ष, रा. सुनसगाव ता. भुसावळ ), अजय कोळी ( वय 35 वर्ष, रा. महादेव मंदीराजवळ, मोहाडी, ता – जळगाव ), मजीत शेख ( वय 46 वर्ष, रा. अशोक किराणा चौक, रामेश्वर कॉलनी ), कडु परखड ( वय 59 वर्ष, रा. आदीत्य चौक, रामेश्वर कॉलनी ) , जगदीश पाटील,( 36 वर्ष, रा. पाणी पुरवठा ऑफीस जवळ, मेहरुण ) , लियाकत अली ( 53 वर्ष, रा. लक्ष्मी नगर ) यांना ताब्यात घेण्यात आले .
या आरोपींच्या ताब्यातून सट्ट्याच्या – जुगाराच्या साहित्यासह रोख 6,300/- रुपये जप्त करण्यात आले . या आरोपींच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .