मुंबई ( प्रतिनिधी ) – दिल्लीत कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ होते आहे. पुन्हा दिल्लीमध्ये कोरोनाचे काही निर्बंध लागण्याची शक्यता आहे. मास्क वापरले नाही तर त्याला 500 रूपयांचा दंड देखील आकारला जाऊ शकतो.
यावेळी मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिल्ली सरकार कोरोनाच्या वाढलेल्या केसेसमुळे चाचणी आणि लसीकरणावर देखील भर देणार आहे. कोरोनामुळे शाळा बंद ठेवल्या जाणार नाहीत, असा निर्णय डीडीएमएच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, शाळांसाठी वेगळा एसओपी जारी केला जाईल. यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलण्यावर भर देण्यात येणार आहे.
दिल्लीमधील कोरोनाची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात येथे 26 टक्के कोरोना रुग्ण वाढले आहेत. मंगळवारी दिल्लीत कोरोनाचे 632 नवीन रुग्ण आढळले. यापूर्वी सोमवारी 501 प्रकरणे नोंदवली गेली होती. यामुळे पालकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे.