पाचोरा (प्रतिनिधी ) – येथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांना मुख्याधिकारी ‘ गट अ ‘ पदावर पदोन्नती झाल्याचे 18 एप्रिलरोजी नगरविकास विभागाचे आदेश प्राप्त होताच नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला दुसऱ्या दिवशी मुख्याधिकारी कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी मुख्याधिकारी बाविस्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन केले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली कार्यालयात फटाक्यांच्या आतिषबाजींने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या दालनाची सजावट कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आलेली होती.
अनपेक्षीतपणे झालेल्या या सत्कारामुळे मुख्याधिकारी भारावून गेल्यात आपुलकीबद्दल सर्वांचे आभार मानतांना त्यांच्या डोळयात आलेले पाणी लपून राहीले नाही.
यावेळी प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, नगररचनाकार मानसी भदाणे, भांडारपाल प्रगती खडसे, रोखपाल सुधीर पाटील, लिपीक रमेश भोसले, राजेंद्र शिंपी, ललित सोनार, विलास देवकर, प्रकाश पवार, संदिप भोसले, किशोर मराठे, प्रकाश गोसावी, रोहीत अहिरे, आकाश खैरनार, संदिप जगताप, नाना धनगर, गोपाल लोहार, भिकन गायकवाड, विशाल मराठे, भागवत पाटील, महेंद्र गायकवाड, रफिक बेग, फिरोज पठाण, सुभाष चौधरी, उध्दव महाजन, अनिल वाघ, युवराज जगताप, विजेंद्र निकम, मनोज पाटील, गणेश अहिरे, कल्पना पवार, यमुना ब्राम्हणे, कल्पना वैद्य, सुरेखा पाटील, रुमा खेडकर, सचिन बागूल, नितीन गायकवाड, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.