जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील आव्हाने येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळविला आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील आव्हाने येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूक रविवार १७ एप्रिल रोजी घेण्यात आली. यामध्ये विद्यमान सरपंच भारती भगवान पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडला आहे तर शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांनी सर्वच्या सर्व जागा १३ जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहेत. शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व विजय दत्तात्रय पाटील यांनी केले.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे – अमोल तेजपाल चौधरी, ज्ञानेश्वर वसंत चौधरी, लक्ष्मण उदयसिंग चौधरी, यादव नागो चौधरी, सुखदेव अवचित पाटील, सोपान शालिग्राम पाटील, उत्तम शामराव पाटील, विजय दत्तात्रय पाटील, जिजाबाई पांडुरंग पाटील, मीराबाई आनंदराव पाटील, किरण ज्ञानेश्वर पाटील, वसंत पौलाद सपकाळे, धर्मराज वामन सोनवणे हे १३ उमेदवार निवडून आले आहेत.