जळगाव ( प्रतिनिधी ) – आयएमए जळगाव या संस्थेतर्फे १७ एप्रिलरोजी ‘ मधुमेहावरील नवीन संशोधन ‘ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या चर्चासत्रासाठी स्पंदन हार्ट सेंटरचे डॉ हर्षल पाटील यांनी सहकार्य केले होते. डॉ चिमु चोपडे यांचे डायीबेटीसवरील औषधोपचार, डॉ. अमित भंगाळे यांचे
डायबेटीस व किडनी, डॉ. हर्शल पाटील यांचे डायीबेटीस व हृदय, डॉ. स्नेहल फेगडे यांचे डायीबेटीस व पायांचे आजार या विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयएमए चे अध्यक्ष डॉ. दिपक आठवले व आयएमए चे सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे यांची खास उपस्थिती होती.
जळगाव शहरातील 150 श्रोत्यांनी व्याख्यानाचा लाभ घेताला नवीन उपचार पद्धतीबद्दल मार्गदर्शन घेतले वक्त्यांनी उपस्थित सदस्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली चर्चासत्राचे नियोजन डॉ. रुपाली बेंडाळे, डॉ.राहुल चिरमाडे यांनी केले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची मान्यता घेऊन उपस्थित सदस्यांना २
गुण बहाल करण्यात आले. डॉ सुयोग चोपडे यांनी आभार उपस्थितांचे आभार मानले .