जळगाव ( प्रतिनिधी ) – इचलकरंजीची परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था , सिधुदुर्गाची अखिल दशावतारी पारंपारिक लोककला अकादमी आणि आशिया बुक रेकॉर्ड असोशिएशनकडून कोल्हापुरात आयोजित महाराणी ताराराणी भोसले राष्ट्रीय विचार सामाजिक संमेलनात जळगावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश अमृतकर यांना स्वराज्यरत्न राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले .
विविध क्षेत्रातील कामांची दखल घेऊन गणेश अमृतकर यांना स्वराज्यरत्न राष्ट्रीय गौरव पुरस्कार अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
गणेश अमृतकर यांना आतापर्यंत विविध सामाजिक संस्थांकडून सत्तेचाळीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत . कोल्हापूरच्या दसरा चौकातील छत्रपती शाहू स्मारक नाट्यगृहात या महाराणी ताराराणी भोसले राष्ट्रीय विचार सामाजिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते .
राजे प्रतीष्ठानच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना पारदे या संमेलनाध्यक्षा होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य सरकारच्या सांस्कृतिक अनुदान , मानधन समितीचे सदस्य बाळकृष्ण मोरे , चित्रपट निर्माते संदीप राक्षे , बाबासाहेब मेमाणे उपस्थित होते . राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापूर ओबीसी सेलचे अध्यक्ष गंगाधर व्हनकोटी यांनी या संमेलनाचे उदघाटन केले .