यावल ( प्रतिनिधी ) – यावल शिवारातील शेतातून अज्ञात चोरट्यांनी पाईंपाची चोरी केली यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .
चंद्रकांत पंडीत चौधरी (वय-५८ रा. देशमुख वाडा, यावल ) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीचे पाण्याचे पाईप यावल शिवारातील रमेश अतुल देशमुख यांच्या शेतात ठेवलेले होते १० एप्रिलरोजी अज्ञात चोरट्यांनी शेतातील पाईप चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात शोधाशोध केली असता त्यांना पाईप कुठेही आढळून आले नाही. अखेर त्यांनी १२ एप्रिलरोजी रात्री यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो ना महेंद्र ठाकरे करीत आहेत .