चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तरवाडे पेठ येथील पाववडे विक्रेत्याला लोखंडी झारा आणि सळईने मारहाण करून गंभीर दुखापत करणाऱ्या चार आरोपींवर . चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे येथील रहिवाशी सोपान निंबा पावले (वय-२५) हे पाववडा विक्री करून उदरनिर्वाह करतात. ४ एप्रिल रोजी सायंकाळी गावातील साईबाबा मंदीराचे गेटसमोर पाववडा विक्रीचे दुकान लावलेले असतांना गावातील राजेंद्र एकनाथ गढरी, डिगंबर एकनाथ गढरी, कृष्णा डिगंबर गढरी आणि एकनाथ काशिनाथ गढरी हे पाववडा गाडीवर आले गिऱ्हाईकांना व सोपान पावले यांना त्यांनीं शिवीगाळ केल्याने वाद झाला. यात चौघांनी लोखंडी सळई आणि लोखंडी झारा डोक्यात मारून गंभीर दुखापत केली आहे. त्यांना रूग्णालयात दाखल केले. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण करीत आहेत.