जळगाव ( प्रतिनिधी ) – स्वातंत्र्य चौकातून २० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास मधुकर चौधरी (वय-५५) हे डोंगर कठोरा येथे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. ८ एप्रिल रोजी सकाळी ते मोटारसायकल (एमएच १९ सीएच ५७८९) ने जळगावात आले होते. स्वातंत्र्य चौकातील बाल न्यायालयाच्या गेटजवळ दुचाकी उभी केली होती. अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल चोरून नेली. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू मोटारसायकल कोठेही आढळून आली नाही. ९ एप्रिल रोजी दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना बापुराव बडगुजर करीत आहेत.