जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील १६ वर्षीय मुलीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १६ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. कुटुंबिय मुळ रहिवाशी आकोला जिल्ह्यातील व बांधकामानिमित्त जळगावला वास्तव्याला आहे. शनिवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा परिसरासह नातेवाईकांकडे शोध घेतला परंतू कोठेही आढळून आली नाही. मुलीच्या आईने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो उ नि शांताराम पाटील करीत आहेत.