पारोळा ( प्रतिनिधी ) – जिल्हा परिषद सेस योजना 2021-22 अंतर्गत कृषी विभागातर्फे शेती व शेतीपुरक व्यवसायात उत्कृष्ट काम केल्याबद्दल आदर्श शेतकरी पुरस्कार आदर्श गांव राजवड येथील निळकंठ पाटील व सौ. पुष्पलता पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला .
गौरवचिन्ह, अभिनंदन पत्र व दहा हजारांचा धनादेश पारोळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय लोंढे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आमदार चिमणराव पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, सौ पुष्पलता पाटील यांनी या दाम्पत्याचे अभिनंदन केले पारोळा तालुका कृषी अधिकारी वाघ, ठाकूर, माजी जि प कृषी सभापती डाँ दिनकर पाटील, शेतकी संघाचे संचालक सुधाकर पाटील, गणपत गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते.