जळगाव ( प्रतिनिधी ) – शॉक लागल्याने जळगावात चार वर्षांच्या तुषार सुधाकर या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज सायंकाळी तांबापुर जुने मेहरुन रोड हनुमान मंदिराजवळ ही दुर्घटना घडली
तुषार घराजवळील मंदिरावर खेळत असताना त्या ठिकाणी परिसरातील लोकांनी वीजेचा आकोडा टाकलेला होता. त्यातील एक आकोडा हा मंदिराजवळ पडलेला होता त्या ठिकाणी तुषार हा खेळत होता आणि खेळता खेळता त्याने ती एक पडलेली वायर हातात पकडली असता त्याला शॉक लागला. या दुर्घटनेत त्याचा म्रूत्यू झाला .
तुषारच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.