जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन १० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजेपासून करण्यात आले आहे.
या निवडचाचणीसाठी केवळ १/ ९/२००३ रोजी वा त्यानंतर जन्म झालेलेच खेळाडू पात्र असतील. पात्र खेळाडूंनी ttps://forms.gle/LGx9H3geCFXT3zEe7 या लिंकवर नोंदणी करावी आधार कार्ड व जन्म तारखेचा मूळ दाखला (केवळ ग्रामपंचयती / नगरपरिषद /नगरपालिका / महानगरपालिका यांनी दिलेला ) अपलोड करावेत.
निवड चाचणीसाठी अनुभुती शाळेच्या मैदनावर क्रिकेट गणवेश, पांढरे बूट व क्रिकेट किट सह उपस्थित रहावे असे जळगांव जिल्हा क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी असोसिशनचे सहसचिव अविनाश लाठी (९८२२६ १६५०३) यांचेशी संपर्क साधावा.