अमळनेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मंगरूळ येथे तब्बल ३५ वर्षानंतर विविध कार्यकारी सोसायटीत परिवर्तन होऊन परिवर्तन पॅनलने १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवला आहे. आधीच्या सत्ताधारी शनैश्वर पॅनलला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत.
श्रीकांत पाटील व भगवान पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल स्थापन होऊन ३५ वर्षांनंतर सहकाराच्या राजकारणाला त्यांनी कलाटणी दिली आहे. परिवर्तनचे सर्वसाधारण जागेत विनोद पाटील (३१५), अरुण पाटील (३०५), जयप्रकाश पाटील (३०१), राजेंद्र पाटील(२९४), कैलास पाटील (२८२) , रणछोड पाटील (२८२), महिला मतदार संघ – मंगलाबाई पाटील (३७७), सिंधुबाई पाटील (३०१), अनुसूचित जाती जमाती मतदार संघ – अरुण घोलप (३१७), नागरिकांचा मागास प्रवर्ग – विश्वास अभिमन (३२९), भटक्या विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्ग – दिलीप गढरी(३५३) यांनी विजय मिळवला आहे. परिवर्तनच्या विजयासाठी दीपक बागुल , राकेश पाटील , जे व्ही बागुल, बापू पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रतिस्पर्धी पॅनलचे भाईदास पाटील (३०५) व अनिल पाटील(२८७) हे दोनच उमेदवार विजयी झाले.
एकूण ६५७ पैकी ६२६ मतदान झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी व्ही एम जगताप यांनी काम पाहिले. त्यांना सचिव निरंक पाटील व रवींद्र पाटील यांनी सहकार्य केले.